Bhosari : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पीडित अल्पवयीन मुलीला तू मला आवडते (Bhosari) म्हणत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या तरुणावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सुमारे चार महिन्यांपूर्वी एमआयडीसी परिसरात घडला आहे.

पंकज (वय 22, पुर्ण पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात 17 वर्षीय मुलीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Ravet Crime : बेकायदेशीररित्या जागा बळकावत बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या शेजारी आरोपी राहतो. त्यांची ओळख होती. मागील दीड वर्षापासून तो फिर्यादीच्या मागे होता. चार महिन्यापूर्वी फिर्यादी या शाळेतून मार्कशीट आणण्यासाठी (Bhosari) जात असताना आरोपीने त्यांना गाडीवरून अज्ञात स्थळी घेऊन जाऊन शारिरीक संबंध ठेवले व पुन्हा गाडीवरून आणून सोडले. यावरून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचाराच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.