Sulochana Chavan : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

एमपीसी न्यूज : अभिनेते विक्रम गोखले यांच्या पाठोपाठ मराठी मनोरंजन क्षेत्रात वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचा मुलगा विजय चव्हाण (Sulochana Chavan) यांनी हि दु:खद बातमी दिली आहे.

लावणी म्हंटले, कि सुलोचना ताईंचा चेहरा आधी समोर येतो. आपल्या ठसकेबाज मधुर आवाजाने त्यांनी मराठी सिनेविश्वावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या जाण्याने (Sulochana Chavan) त्यांच्या चाहत्या वर्गाने दु:ख व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.