Khed : शेतातील बांधावरून पाच जणांकडून कुटुंबाला मारहाण

एमपीसी न्यूज – शेतातील बांधावरून पाच जणांनी (Khed) पती, पत्नी व मुलाला मारहाण केली आहे. ही घटना गोकुळेवाडी खेड येथे शुक्रवारी (दि.9) घडली आहे.

याप्रकरणी संजय किसन गोकुळे (वय 50 रा. गोकुळेवस्ती) यांनी फिर्याद दिली असून प्रविण बाळु गोकुळे, रणजीत बाळासाहेब गोकुळे, बाळु गुलाब गोकुळे, विष्णू पोपट गोकुळे, संतोष राघुजी गोकुळे यांच्यावर गुन्ह दाखल कऱण्यात आला आहे.

Sulochana Chavan : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेतात काम करत असताना (Khed) आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादीची पत्नी व मुलगा व फिर्यादी यांना हाताने व पायाने मारहाण केली. तसेच दगडाने मारहाण करत दुखापत केली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.