Ravet : पवना नदीत आढळला महिलेचा मृतदेह

एमपीसी न्यूज – पवना नदीत रावेत येथे एका महिलेचा मृतदेह आढळला. हा प्रकार आज (गुरुवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आला.

मंगला अशोक शिंदे (वय 55, रा. धर्मराज मंदिराजवळ, रावेत) असे मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगला शिंदे मागील एक आठवड्यापासून आजारी होत्या. आजारपणात त्या नैराश्यात होत्या. मागील तीन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. घरातील मंडळींनी नातेवाईक, मित्र आणि ओळखीच्या लोकांकडे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा काहीही तपास लागला नाही. आज सकाळी त्यांचा मृतदेह रावेत येथे संत तुकाराम महाराज उड्डाण पुलाजवळ असलेल्या पवना नदीच्या बंधा-यात आढळून आला.

मंगला यांचा मृत्यू मागील दोन ते तीन दिवसांपूर्वीच झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी वाकड पोलिसांना पाण्यात मृतदेह असल्याची माहिती दिली. वाकड पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.