Ravi Chaudhary : भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी निवड

एमपीसी न्यूज : भारतीय वंशाचे रवी चौधरी (Ravi Chaudhary) यांची अमेरिकच्या संरक्षण उपमंत्रीपदी निवड झाली आहे. त्यांच्याकडे अमेरिकी हवाई दलाची जबाबदारी असणार आहे.  पेंटागनमधील सर्वोच्च पदांपैकी हे एक पद आहे.  

 

रवी चौधरी यांनी यापूर्वी अमेरिकेच्या परिवहन विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.   एरोस्पेस आणि संरक्षण तज्ज्ञ असून त्यांनी यापूर्वी अमेरिकन हवाई दलात उच्च पदांवर काम केले आहे. तसेच चौधरी हे अमेरिकन हवाई दलात  वैमानिक आणि अधिकारी म्हणून देखील काम पाहिले आहे.(Ravi Chaudhary)  चौधरी 1993 ते 2015 या काळात एअरफोर्सचे अॅक्टिव्ह मेंबर होते. या कालावधीत त्यांनी ऑपरेशन आणि फंक्शनल अशा दोन डिव्हीजनचे नेतृत्व केले आहे. सी-17 चे देखीलत ते पायलट होते.

 

Honda : ‘शाइनचा तोच विश्वास, आता 100 सीसीमध्ये’

 

अफगाणिस्तान आणि इराक युद्धातील अनेक ऑपरेशनमध्ये ते सहभागी होते. इराकमध्ये बरेच दिवस ते कार्यरत होते. चौधरी हे एविएशन इंजिनिअर देखील आहेत.(Ravi Chaudhary)अमेरिकेच्या हवाई दलाला लेटेस्ट टेक्नॉलाॉजी देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमीका बजावली आहे. ओबामा यांच्या कार्यकाळात रवि चौधरी हे प्रेसिडेंट अॅडव्हाजरी कमिशनचे सदस्य होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.