Dehuroad Corona Update : चिंचोलीत 2, शितळानगर नं एकमध्ये एका नवीन रुग्णाची नोंद; तिघांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज ( गुरुवारी ) तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामध्ये चिंचोली येथील दोन आणि शितळानगर नं एक मधील एका रुग्णाचा समावेश आहे. तर कोरोना मुक्त झालेल्या तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.  हद्दीतील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 8 इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1367 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्या पैकी सध्या एका रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आतापर्यंत एकूण 1324 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. होम आयसोलेशनमध्ये 7 रुग्ण असून हद्दीत एकूण 8 सक्रिय रुग्ण आहेत. तर कोरोना मुक्त झालेल्या तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सीजिएच कोविड सेंटरमध्ये सध्या एकही रुग्ण दाखल नाही. कोरोनामुळे आजपर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.