Pimpri corona Update : शहरातील कोरोना रुग्णसंख्या एक लाख पार, आज 111 नवीन रुग्णांची नोंद

46 जणांना डिस्चार्ज, 6 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील आजपर्यंतची कोरोनाची रुग्णसंख्या एक लाख पार झाली आहे. शहराच्या विविध भागातील 110 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 111 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. यामुळे शहरातील रुग्णसंख्या 1 लाख 14 वर पोहोचली, तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 46 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील चार आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा सहा जणांचा आज मृत्यू झाला. त्यामध्ये पिंपरीतील 68 वर्षीय पुरुष, दापोडीतील 68 वर्षीय पुरुष, नेहरुनगर येथील 75 वर्षीय पुरुष, वडमुखवाडीतील 88 वर्षीय पुरुष, आंबेगाव येथील 84 वर्षीय पुरुष, नारायणगाव येथील 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 14 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 96 हजार 444 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1804 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 759 अशा 2563 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 582 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 561 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आज दिवसभरात 675 जणांनी कोरोनाची लस घेतली. आजपर्यंत 3991 जणांचे लसीकरण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.