Pimpri news: सेवानिवृत्त कर्मचा-यांनी  सेवेतील कर्मचा-यांना मार्गदर्शन करावे – महापौर ढोरे

Retired employees should guide the service personnel- Mayor Dhore

एमपीसी न्यूज – सेवानिवृत्त कर्मचा-यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेच्या अनुभवाचा उपयोग सध्या काम करणा-या कर्मचा- यांना मार्गदर्शन करण्यासाठी करावा, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

माहे ऑगस्ट 2020 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या 14 कर्मचा-यांचा सत्कार समारंभ आज (सोमवारी) स्थायी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी  त्या बोलत होत्या.

कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सरचिटणीस सुप्रिया जाधव, बाळासाहेब कापसे, योगेश वंजारे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरवे, अमित जाधव उपस्थित होते.

आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त सत्कार झालेल्यांमध्ये प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, भांडारपाल रविंद सिंदकर, संभाजी गावडे, मुख्य लिपिक मछिंद्र कुमार, दिलीप नेमाडे, ए.एन.एम. साधना चव्हाण, सहाय्यक उद्यान अधीक्षक शरद बगाडे, उपशिक्षिका सीता पाढरे, मजूर महादेव लोंडे, रखवालदार बाळू शिंदे, साईदास जगताप, मुकादम महादेव पवार यांचा समावेश होता.

तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या उपशिक्षिका स्मिता कोठावळे आणि सफाई कामगार शकुंतला विटकर यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.