Pune : पुणे जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलिस बांधवांची निवृत्ती सन्मानाने व्हावी

संपतराव जाधव सेवानिवृत्त पोलिस बांधव कल्याणकारी संस्थेची मागणी

एमपीसी न्यूज   : पुणे (Pune) जिल्ह्यातील पोलिस बांधव भगिनी हे 38 ते 40 वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावून सेवानिवृत्त होत असतात, सेवानिवृत्तीच्या दिवशी पुणे ग्रामीण पोलिस खात्याकडून त्यांच्या यथोचित सन्मान केला जात नाही. पोलिस खात्याकडून त्यांचा सन्मान करण्यात यावा अशी मागणी सेवानिवृत्त पोलिस बांधव कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष संपतराव जाधव यांनी केली आहे.

Akurdi : आकुर्डीत पाणीपुरवठा विस्कळीत

सेवानिवृत्त पोलिस बांधव कल्याणकारी संस्थेच्यावतीने पुणे (Pune) ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना  संस्थेचे अध्यक्ष संपतराव जाधव, कार्याध्यक्ष महादेव पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले.  यावेळी संस्थेचे मच्छिंद्र कुंभार, कैलास ढेरे, अविनाश भोसले, श्रीमान गजभिव आदी सेवानिवृत्त पोलिस पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक पुणे (Pune) जिल्हा‌ ग्रामीण या विभागाकडून अनेक महिन्यापासून, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करून निरोप देण्याची प्रथा बंद असल्याचे अनेक पोलिस बांधवांकडून समजले असून हे अत्यंत चुकीचे असल्याचे पुणे पोलिस अधीक्षक गोयल यांच्या निदर्शनास स़स्थेचे अध्यक्ष संपतराव जाधव आणि शिष्टमंडळाने आणून दिले. सेवानिवृत्त पोलिस बांधव कल्याणकारी संस्थेच्यावतीने जी मागणी केली आहे तिची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा शिखर संस्थेचे माध्यमातून सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे संस्थेचे कार्याध्यक्ष महादेव पवार यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी यावेळी सांगितले की पोलिस भरती वगैरे, कामाच्या व्यस्ततेमुळे सेवानिवृत्त अंमलदार यांचे  निरोप समारंभ व सन्मानची कार्यवाही झाली नसल्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे पाठीमागील काही महिन्यांमध्ये, निवृत्त झालेले आणि नियमित निवृत्त होणारे सर्वांचे सन्मानपूर्वक निरोप समारंभ कार्यक्रम करण्यात येतील असे आश्वासन दिले. तसेच सेवानिवृत्त पोलिस सदस्यांच्या अडीअडचणी व कल्याणकारी बाबी अशा सर्व गोष्टींच्यावर सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे गोयल यांनी सांगितले आहे. याबाबत माहिती दिनेश कुऱ्हाडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.