Pune : पुणे जिल्ह्यातील कत्तलखाने, दारू , चिकन, मटनची दुकाने 22 जानेवारीला बंद ठेवण्याची शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज –  22 जानेवारीला 2024 ला पुणे जिल्ह्यातील सर्व ( Pune ) कत्तलखाने,दारूचे दुकाने,चिकन,मटन चे बंद ठेवण्याची मागणी शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहर संघटक रवींद्र ब्रम्हे यांनी केली आहे.

PMRDA : म्हाळुंगे  येथील शेडगे वस्ती ते एमआयडीसी सर्कल रस्त्याने घेतला मोकळा श्वास

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, येत्या 22 जानेवारी 2024 ला प्रभू श्रीराम यांची अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा महोत्सव पार पडणार आहे, हा दिवस देशातील सर्व हिंदूंसाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र असा दिवस असणार आहे. कारण 500 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अयोध्या येथे प्रभू श्रीराम लल्लाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

एवढ्या दशकांच्या प्रतिक्षे नंतर हिंदूंचे स्वप्न पूर्ण होत आहे. 22 जानेवारी हा दिवस इतिहासात सोनेरी अक्षराने लिहला जाणार आहे. याचे साक्षी आपण सर्व जण होणार आहे हे आपल्या सर्व भारतीयांचे भाग्य आहे.  सर्व हिंदू धर्मातील लोकांच्या भावना लक्षात घेता 22 जानेवारी 2024 ला संपूर्ण पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील कत्तलखाने, मटण, चिकन व दारूचे सर्व दुकाने बंद ठेवण्यात यावे.

प्रभू श्रीराम यांची प्राण प्रतिष्ठा ही हिंदूंच्या आस्थेशी जुडलेली आहे.  म्हणून प्राणप्रतिष्ठेच्या पवित्र दिवशी कोणत्या पशु,पक्ष्याची हत्या होऊ नये अशी सर्व हिंदूंची तीव्र भावना आहे, असे निवेदनात म्हटले ( Pune ) आहे.

https://www.youtube.com/shorts/n9XLbysEHWU

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.