PMRDA : म्हाळुंगे  येथील शेडगे वस्ती ते एमआयडीसी सर्कल रस्त्याने घेतला मोकळा श्वास

एमपीसी न्यूज –  म्हाळुंगे येथील शेडगे वस्ती ते एमआयडीसी चौक ( PMRDA) म्हाळुंगे  येथील 36 मीटर रस्त्याच्या हद्दीमधील अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकाम यांचे सुमारे  8227.00 स्क्वेअर फुट निष्कासन कारवाई पुणे महानगर प्रदेश विकास यांच्यामार्फत  करण्यात आली.

Pimpri : दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी  शंकर जगताप यांची निवड

या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या कारवाईमुळे टीपी स्कीम मधील रस्त्याच्या कामाला गती मिळेल. तसेच या कारवाईमुळे सदर मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. कारवाईच्या वेळी पीएमआरडीएचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. रस्त्यामध्ये अतिक्रमण करणारी सर्व बांधकामे काढून घेण्याचे आवाहन पीएमआरडीएच्या सह आयुक्त मोनिका सिंह ( PMRDA) यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.