Sachin Tendulkar : ‘मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर’ने पूर्ण केले वयाचे अर्धशतक; जाणून घेऊयात क्रिकेटच्या देवाने केलेले भव्य विक्रम

एमपीसी न्यूज – ‘क्रिकेटचा देव’ किंवा ‘गॉड ऑफ क्रिकेट’ असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला. (Sachin Tendulkar) बरेच क्रिकेटप्रेमी सचिन तेंडुलकरला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मानतात. 24 वर्षांच्या यशाने भरलेल्या कामगिरी मध्ये सचिनने क्रिकेट जगतातले बरेच विक्रम मोडले आणि स्वतःचे नवीन विक्रम बनवले सुद्धा. आज या महान फलंदाजाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या अतूट विक्रमांचा आढावा…

  1. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

सचिन तेंडुलकर याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. त्याने क्रिकेटच्या सर्व स्वरूपामध्ये 34 हजार 357 धावा काढल्या आहेत. इतर कोणताही फलंदाज आजवर 30 हजार धावांपर्यंत देखील पोहोचलेला नाही.

 

  1. आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने

सचिन तेंडुलकर याने स्वतःच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 200 टेस्ट सामने खेळले आहेत. त्याने स्वतःच्या 200 व्या टेस्ट सामन्यानंतर निवृत्ती घेतली. त्याच्यानंतर टेस्ट क्रिकेट मधले सर्वाधिक सामने हे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (169) याच्या नावावर आहेत.

 

  1. टेस्ट क्रिकेट मध्ये सर्वाधिक चौकार

सचिन तेंडुलकर याच्या नावावर टेस्ट क्रिकेट मध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम सुद्धा आहे. सचिनच्या आक्रमक फलंदाजीचा त्याकाळी ग्लेन मॅकग्राथ, ब्रेट ली, वसीम अक्रम, वखार युनूस, चामिंदा व्यास, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन आदी महान गोलंदाजांना सामना करावा लागला. त्याने या गोलंदाजांसमोर चांगली खेळी करून हा पराक्रम केला आहे.

 

  1. एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये पहिले द्विशतक

सचिन तेंडुलकर याने फेब्रुवारी 2010 मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध हा विक्रम केला होता. 200 धावांची नाबाद पारी त्याने खेळली होती. त्यावेळी पहिल्यांदा कुठल्यातरी फलंदाजाने हे काम केले होते.

 

  1. सगळ्यात कमी वयात भारतीय क्रिकेट संघामध्ये पदार्पण

सचिन तेंडुलकर हा अवघ्या 16 वर्षांचा असताना त्याने भारतीय क्रिकेट संघामध्ये पदार्पण केले होते. 1989 मध्ये त्याने संघात पदार्पण केलेले असून आजवर हा विक्रम कोणीही मोडला नाही आहे.

Pune News : ‘मियाँ बिबी राजी तो’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विवाहितांसाठीची अनोखी स्पर्धा संपन्न

 

  1. क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा

सचिनने सहा विश्वचषकांमध्ये सहभाग घेतला आहे. त्याने विश्वचषकात 45 सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये त्याने 2 हजार 278 धावा काढल्या आहेत. अजून कोणीही 2 हजार धावांचा टप्पा गाठला नाही.

 

  1. क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके

बऱ्याच जणांना सचिनचा हा पराक्रम माहीत असेलच. त्याने 2012 बांगलादेश विरुद्ध स्वतःचे शंभरावे शतक मारले. आजपर्यंत कोणत्याही फलंदाजाने 80 पेक्षा अधिक शतके मारलेली नाहीत. हा पराक्रम मोडणे फारच कठीण आहे.

 

  1. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी

सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी न्यूझीलंड विरुद्ध खेळताना हा विक्रम केला. या सामन्यामध्ये दोघांनी मिळून 331 धावांची भागीदारी केली. हा सामना 8 नोव्हेंबर 1999 रोजी झाला होता.

 

  1. भारतीय टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरी

सचिन तेंडुलकर याची टेस्ट क्रिकेट मध्ये धावांची सरासरी एका भारतीय खेळाडूसाठी सर्वात जास्त आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 53.78 एवढ्या सरासरीने धावा बनविल्या.

 

  1. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा

हा विक्रम सचिनने 1998 मध्ये केला होता. त्याने फक्त 33 पारींमध्ये 1894 धावा काढल्या. त्यावर्षी सचिनने 65.31 एवढ्या सरासरीने 9 शतके व 7 अर्धशतके मारली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.