Pune News : ‘मियाँ बिबी राजी तो’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विवाहितांसाठीची अनोखी स्पर्धा संपन्न

एमपीसी न्यूज – नवीन पिढीतील जोडप्यांना (Pune News) तसेच विवाह इच्छुक मुलामुलींसमोर यशस्वी वैवाहिक जीवनाचा आदर्श ठेवण्याच्या उद्देश्याने गेली 4 वर्षे पुण्यातील हर्टझ म्युझिक तर्फे मियाँ बिबी राजी तो.. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. व्यक्तिमत्व अथवा सौंदर्य स्पर्धा महिला, पुरुष किंवा युवक युवतींसाठी घेतल्या जातात परंतु, विवाहित जोडप्यांसाठी म्हणून घेतलेली ही पहिलीच स्पर्धा होती. हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला.

सामाजिक कार्यकर्ते आणि समोपदेशक डॉ. राजेंद्र भवाळकर, मिडास टच इन्स्टिट्यूटच्या संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय सौंदर्य तज्ञ डॉ. अंजली जोशी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. आरसा मेकअप स्टुडिओच्या वतीने मेकअप आर्टिस्ट धनश्री शेखरे यांनी आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी सर्व स्पर्धकांना आकर्षक स्वरूपात सादर केले.

स्पर्धेच्या फेरीमध्ये, गायिका अनुपमा कुलकर्णी, मोहन नारंग, डॉ. माया माईणकर, नम्रता काटकर, साधना रोटे, अद्वैत लेले, उमेश कुलकर्णी, ऋषिकेश ग्रामोपाध्ये, शशिकांत माने आणि श्रद्धा गायकवाड यांनी गायलेल्या हिंदी मराठी जुन्या सुमधुर गीतांनी रंगत आणली.

Nigdi News : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळात प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

संगीताच्या तालावर रॅम्पवॉक, शानदार नृत्य झटपट प्रश्नमंजुषा (Pune News) आणि फन गेम्समधून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पाच जोडप्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ घोषित करण्यात आले. यामध्ये सुनिता आणि मोहन जाधव, साधना आणि दिपक रोटे, राधिका आणि नरेंद्र शिंदे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसाचे मानकरी ठरले. अंतिम फेरीतील सहभगी झालेल्या सर्व विजेत्यांना उपशिर्षक देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास ध्वनी -अमोल कोळेकर, प्रकाश योजना- विजय चेनूर, व्हिडीओग्राफी – विक्रम क्रिएशन, रंगमंच व्यवस्था – रणजित सोनावळे आणि व्यासपीठ समन्वयक-अजित पांढरे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजन श्रद्धा गायकवाड यांचे होते. संयोजन करुणा पाटील यांनी केले. आकाश सोळंकी यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.