Mumbai : सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – जगभरामध्ये क्रिकेटविश्वात भारताची मान उंचावणा-या सचिन तेंडुलकर याला घडविणारे गुरु रमाकांत विठ्ठल आचरेकर (वय 87) यांचे आज बुधवारी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेटविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट प्रशिक्षक म्हणून आचरेकर सरांची कारकीर्द गाजली. रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर याच्यासह विनोद कांबळी , प्रवीण आमरे, अजित आगरकर चंद्रकांत पंडित, बलविंदर सिंग संधू या खेळाडूंना घडविण्याचे काम केले. 2010 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने तर 1990 साली त्यांना मानाच्या द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

भारतीय क्रिकेट संघाला खणखणीत नाणे देणारे गुरु रमाकांत आचरेकर यांना द्रोणाचार्य पुरस्कार , पद्म श्री पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते . त्यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे . उद्या (गुरुवारी) त्यांच्यावर सकाळी 10 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.