Sangavi News: ‘छावा मराठा’च्या पुणे शहराध्यक्षपदी अतुल निकम, पिंपरी-चिंचवड शहाराध्यक्षपदी गणेश कोतवाल  

एमपीसी न्यूज – छावा मराठा संघटनेने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. संघटनेच्या पुणे शहराध्यक्षपदी निवृत्त सैनिक अतुल निकम यांची; तर पिंपरी-चिंचवड शहाराध्यक्षपदी गणेश कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले.

सांगवी येथे आयोजित संघटनेच्या बैठकीत जिल्हाप्रमुख जाधव यांनी पदनियुक्त्या जाहीर केल्या. यावेळी संघटनेचे राजू सदलापूरकर, गणेश सोनवणे, संजय साळवे, राजधन धुसिया, स्वप्नील नायर, दत्ताभाऊ धावडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

संघटनेच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी सचिन अहिर यांची, पिपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी किरण देवकर व पवनराजे काळभोर यांची, दापोडी विभाग अध्यक्षपदी संदीप नरबेकर यांची, तर अमर कुटे यांची वडगाव शेरी विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी निवृत्त सैनिक अतुल निकम म्हणाले, समाजात काम करताना संघटनात्मक पाठबळाची आवश्यकता असते. त्याचवेळी निष्पक्षपणे काम करता आले पाहिजे. छावा मराठा संघटना ही राज्य, तसेच जिल्हा पातळीवर निष्पक्षपणे सामाजिक काम करणारी संघटना आहे. समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडवून संघटना वाढीस प्रयत्नशील राहणार आहोत.

जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव म्हणाले, छावा मराठा संघटनेचे राज्य पातळीवर मोठे काम चालते. जिल्हा स्तरावरही संघटना प्रभावीपणे काम करीत आहे. संघटनेच्या विस्ताराचा भाग म्हणून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर परिसरात पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पदाधिकाऱ्यांनी कार्यक्षमपणे काम करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.