Pune News: महापालिका निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्त्व द्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी 

एमपीसी न्यूज – पुणे शहरात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणात संधी द्या अशी मागणी केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संगिता आठवले यांनी केली आहे. पुणे महापालिका निवडणुका जवळ येत आहे त्या पार्श्वभूमीवर लोणावळा येथे रिपब्लिकन पक्षाची राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक झाली त्यावेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. 

तीन च्या प्रभाग पद्धतीला कार्यकर्त्यांनी विरोध केल्याचे यावेळी संगीता आठवले यांनी सांगितले. यावर पक्षाच्या वतीने कोर्टात जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. या बैठकीसाठी ना.खा. रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रुपेश फुलकर, जनरल सेक्रेटरी राजाभाऊ सरवदे, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बाबूराव कदम, महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा महिला आघाडी आशाताई लांडगे, पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष म.आघाडी संगीता आठवले, महाराष्ट्राच्या जनरल सेक्रेटरी महिला आघाडी चंद्रकांता सोनकांबळे, युवक आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर उपस्थित होते.

तसेच, महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे शहराच्या महिलाध्यक्षा शशी वाघमारे, महाराष्ट्र उपाध्यक्ष राणीताई भेलके, रिपब्लिकन पक्षात अंतर्गत विविध आघाड्या चे प्रमुख अल्पसंख्यांक आयुब शेख, मातंग आघाडी हनुमंत साठे, रोजगार आघाडी, व्यापारी आघाडी, ब्राह्मण आघाडी तसेच विद्यार्थी आघाडी, वकील आघाडी, डॉक्टर आघाडी अशा विविध आघाडीच्या माध्यमातून राज्यभरातून आघाडीचे प्रमुख वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थित राज्य कमिटीची बैठक पार पडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.