Sangvi : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक,अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई

एमपीसी न्यूज – स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर (Sangvi)पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून तीन महिलांची वेश्या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केली आहे. ही कारवाई पिंपळे निलख येथील जे पी फॅमिली स्पा येथे करण्यात आली.

स्पा चालक मालक जया अशोक जाधव (वय 33, रा. बोपोडी, पुणे), निखिल मोहन नवघन (वय 31, रा. लक्ष्मी नगर, थेरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

इंगवले नगर, पिंपळे निलख येथे जे पी फॅमिली स्पा येथे वेश्या (Sangvi)व्यवसाय सुरु असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यावेळी स्पा सेंटरमध्ये तीन महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केल्याचे निदर्शनास आले. त्या तीनही महिलांची सुटका करून स्पा सेंटर चालक मालक आणि एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Punawale : प्रस्तावित कचरा डेपोची जागा पोलीस आयुक्तालयाला द्या; पुनावळेकर नागरिकांची मागणी

दोघांना सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.