Diwali festival: बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी उसळली

एमपीसी न्यूज – भारतासह जगातील विविध देशांमध्ये उत्साहात साजरा करण्यात (Diwali festival )येणा-या दीपावलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये दीपावलीच्या खरेदीसाठी रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून बाजारात लोकांची मोठी गर्दी उसळली आहे. पिंपरी, चिंचवड, सांगवी, पिंपळे गुरव, भोसरी, चिखली, निगडी परिसरात दिवाळीच्या अनुषंगाने उपयुक्त वस्तूंचे मोठमोठे स्टॉल उभारण्यात आले आहेत.

कापड बाजारात खरेदीसाठी लोकांनी पारंपारिक वस्त्र खरेदीला प्राधान्य (Diwali festival )दिल्याचे पहायला मिळते. घरातील विविध वस्तूंची खरेदी देखील दिवाळीच्या निमित्ताने करण्यात येते. बाजारात मातीचे दिवे, फॅन्सी दिवे, रेडीमेड गडकिल्ले, मुर्त्या, बहुरंगी रांगोळी, आकाश कंदील, प्लास्टिकच्या फुलमाळा, झुंबर, दारातील तोरणं आणि पडदे, वार्षिक डायरी आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणात बाजारात आवक झाली आहे. रंगबेरंगी सजावटीचे साहित्य खरेदीसाठी लोकांची गर्दी हे रविवारचे खास आकर्षण होते. ठिकठिकाणी दिपावली सेल देखील मांडण्यात आले आहेत. याठिकाणी दिवाळीचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Punawale : पुनावळेत कचरा डेपो होऊ देणार नाही – आमदार अश्विनी जगताप

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौकाचौकात फटाक्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय बनावटीच्या फटाक्यांसह विदेशी फटाक्यांची आवक झाल्याचे दिसते. पिस्तोल, लहानसहान व फॅन्सी फटक्यांसह ध्वनिवर्धक फटाके देखील बाजारात उपलब्ध झाले आहेत.

मिठाई विक्रीसाठी अनेक ठिकाणी पाकीटबंद आणि खुल्या स्वरुपात मिठाई विक्री होताना दिसते आहे. तसेच सोने चांदी खरेदीसाठी आज शहरातील सराफा बाजारातही ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीसह दागिने खरेदीला लोक प्राधान्य देतात.

 

 

इलेक्ट्रॉनिक्स बाजारात दिव्यांची माळा, बहुरंगी रोषणाई करणाऱ्या दीपमाला, रंगबेरंगी लायटिंग विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. दिवाळी निमित्त आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्वस्तूंपैकी 90 टक्के वस्तू या चीनी बनावटीच्या आहेत, असे शहरातील व्यापारी पवन गजवानी यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.