Vadgaon Maval News : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी सतीश भेगडे 

एमपीसी न्यूज  – शेलारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व तळेगांव दाभाडे येथील श्री. डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव सतीश प्रकाश भेगडे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

मावळचे आमदार सुनील शेळके,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बबन भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे यांच्या हस्ते सतीश भेगडे यांना सदर निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी दीपक हुलावळे, अर्चना घारे, अॅड कृष्णा दाभोळे, अॅड प्रवीण झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी पक्षवाढीसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने किमान दोन तास वेळ द्यावा, असे आवाहन केले.

उत्तम सूत्रसंचालक, मनमिळावू स्वभाव व कुशल संघटक असे विशेष गुण असणाऱ्या भेगडे यांच्या निवडीने कौतुक व आनंद व्यक्त होत आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष अधिकाधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा मनोदय भेगडे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.