BNR-HDR-TOP-Mobile

Pune : जाता जाता सौरभ राव यांनी दिला दोन अधिकाऱ्यांना झटका

एमपीसी न्यूज – वर्षानुवर्षे एकाच खात्याचा पदभार पाहणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची बदली करून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या अधिकाऱ्यांना जाता जाता जोरदार झटका दिला. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तक्रारी केल्या होत्या.

पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांच्याकडे मुख्य अभियंता पथ विभाग म्हणून जबाबदारी देण्यात आली. तर, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावस्कर यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय 24 बाय 7 पाणीपुरवठा कक्षाचे कामकाज त्यांच्याचकडे राहणार आहे. मलनिस्सारण विभागाकडील कामकाज, भामा – आसखेड आणि जायका या प्रकल्पांचा अतिरिक्त पदभार अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like