Pune : डॉ. दळवी हॉस्पिटलचा ‘कायाकल्प आरोग्य घटकात’ राज्यात प्रथम क्रमांक

स्टाफचे नगरसेवक आदित्य माळवे यांनी केले अभिनंदन

एमपीसी न्यूज – स्वच्छ भारत अभियान अंतर्गत असलेल्या ‘कायाकल्प’ या आरोग्य घटकात पुणे महापालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. 15 लाख रुपये पारितोषिक मिळाले आहे. त्याबद्दल हॉस्पिटलमधील सर्व स्टाफचे भाजपचे नगरसेवक आदित्य माळवे यांनी अभिनंदन केले.

महापालिकेचे विविध दवाखाने व रुग्णालयाला राज्यात सर्वाधिक 21 लाख 50 हजार रुपये पारितोषिक मिळाले आहेत. पुणे महापालिका ही राज्यात आरोग्य विभागात प्रथम आली आहे. बालजीनगर येथील काशीनाथ आनाजी धनकवडे प्रसुतीगृहाला उत्तेजनार्थ एक लाख रुपये बक्षीस मिळाले आहे. पुणे महापालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचीही तपासणी करण्यात आली. त्यामुळे महापालिकेतील 5 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना साडेपाच लाख रुपये पारितोषिक मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.