Pune : 7 मार्च रोजी होणार सादर पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प

एमपीसी न्यूज – 7  मार्च रोजी  पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ( Pune ) सादर होणार आहे. 2024- 25  या वर्षाचा महापालिकेचा अर्थसंकल्प  महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार हे स्थायी समितीला सादर करणार आहेत.

सलग तिसऱ्या वर्षी मार्च महिन्यातच अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार आयुक्तांनी 15 जानेवारीपर्यंत स्थायी समिती समोर अर्थसंकल्प मांडणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून महापालिकेवर प्रशासक असल्याने अर्थसंकल्प बाबत स्थायी समिती आणि मुख्य सभेत कोणताही निर्णय होत नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही  मार्च महिन्यातच अर्थसंकल्प  सादर होतो आहे .

मागच्या वर्षी   9592  कोटीचा अर्थसंकल्प सादर केलेला होता. यंदा महापालिकेचा अर्थसंकल्प दहा हजार कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.