Pune : जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळा गुरुवार, शुक्रवारी बंद

एमपीसी न्यूज – घाट भागात बुधवारी (दि. 19) झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज (गुरुवारी, दि. 20) आणि उद्या शुक्रवारी (दि. 21) दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. या भागातील अंगणवाड्याही आज आणि उद्या बंद ठेवल्या जाणार आहेत.

Pimpri : शहरात केवळ 319 खड्डे असल्याचा पालिकेचा दावा

ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि सीडीपीओ यांनी परिसरात असणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहतील. हा आदेश अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, सर्व मंडळांशी संलग्न अनुदानित व खाजगी शाळांना लागू आहे.

 

इतर सर्व भागातील शाळा आणि अंगणवाड्या सामान्यपणे चालू राहतील, असेही आदेशात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.