Talegaon Dabhade News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुंदआण्णा खळदे यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष मुकुंद (आण्णा)  पंढरीनाथ खळदे  (वय 82) यांचे आज (शनिवारी) सकाळी आठच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, भाऊ, बहीण, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक,  इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी सचिव तर गेली चाळीस वर्षे ते या संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत होते.तालुक्यातील व तळेगाव शहरातील विविध सामाजिक, सहकार व शैक्षणिक  संस्थांशी ते संबंधित होते.

काँग्रेसचे शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे यांचे ते  पुतणे तर उद्योजक सुरेश खळदे, यांचे ते बंधू होत. मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष महेश खळदे यांचे ते वडील होत.

खळदे परिवारातील सतीश खळदे यांच्या पाठोपाठ मुकुंद खळदे यांचेही याच आठवड्यात निधन झाल्याने तळेगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.