India News – ‘जवान’मधील शाहरुख खानचा ‘फस्ट लुक’ इंटरनेटवर वायरल; नेटकरींकडून संमिश्र प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज – सोमवारी सुपरस्टार शाहरुख खानचा नवा येणारा चित्रपट ‘जवान’चा प्रिव्हयु पूर्ण इंटरनेटवर वायरल झाला. शाहरुख खान स्वतःच्या इतर भूमिकांपेक्षा काहीतरी हटके करतोय असे त्याच्या नव्या रुपावरुन देशभरातील तमाम चित्रपट चाहत्यांनी अंदाज लावला आहे. त्याच्या या नवीन रुपाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

PCMC : परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य योजनेतील लाभाची रक्कम वाढवा – सीमा सावळे

रेड चिली एंटरटेनमेंट आणि गौरी खान निर्मित व आटली कुमार दिग्दर्शित या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. नुसते चाहतेच नव्हे तर शाहरुख खानच्या तमाम बॉलिवूड सहकार्यांनी सुद्धा सोशल मीडिया द्वारे चित्रपटाला स्वतःच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खानने ‘ पठाण जवान बन गया’ असे ट्विट करून चित्रपटाचे कौतुक केले आहे.

बॉलीवूड अभिनेता, नील नितीन मुकेश यानेही शाहरुख खानचे कौतुक ट्विटद्वारे  व्यक्त केले आहे. त्याने स्वतःच्या शाहरुख खानचे ट्विट कोट करत तो चित्रपटाची किती आतुरतेने वाट बघत आहे व ‘ सिम्पली माईंडब्लोईंग’ असे ट्विट केले आहे.

काही वर्षांपूर्वी शाहरुख खान आणि सैफ अली खान फिल्मफेअरचे होस्ट करत असताना शाहरुख खानने नील नितीन मुकेशला नावावरून टीका केली होती व त्यांचे सर्व लोकांसमोर भांडणही झाले होते. नील नितीन मुकेशला स्वतःची चेष्टा सहन झाली नसून त्याने तेव्हा एसआरकेला ‘शट अप’ म्हटले होते. परंतु शाहरुख खान त्यावेळी स्वतःची चूक मान्य करत नीलची माफी मागितली होती.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला शाहरुख खानचे बरेच रूप बघायला मिळत आहेत व ते सर्व रूप काही परिक्षण फार पसंत पडले आहेत तर काही लोक त्याची निंदाही करीत आहेत. लूक्सबाबत काहीही मत असले तरी नायंथारा, विजय सेतुपाती यांचा स्टार कास्ट आणि दीपिका पदुकोन हिच्या कॅमिओमुळे प्रेक्षक फार आतुरतेने चित्रपटाची वाट पाहत आहेत.

 

 

https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1678786091284070400?s=20

 

https://twitter.com/NeilNMukesh/status/1678793379646435328?s=20

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.