Sharad Mohol : गणेश मारणेचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

एमपीसी न्यूज – कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक ( Sharad Mohol)  असलेल्या गणेश मारणेला सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी हा आदेश दिला.

 

या प्रकरणात पाहिजे आरोपी असलेला आरोपी गणेश मारणे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सोमवारी (दि.29 )  सुनावणी झाली. मोहोळवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी आरडाओरडा करताना मारणेचे नाव घेतले आहे.

त्यामुळे गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय मारणेला अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे या अर्जावर येत्या शनिवारी (दि. 3 ) सरकार पक्ष म्हणणे मांडणार आहे.

Pune : आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

मोहोळ खून प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत आतापर्यंत पंधरा आरोपींना अटक झाली असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्कानुसार कारवार्इ करण्यात आली आहे. मारणे हा या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असल्याचा पोलिसांना संशय आहे.

त्यामुळे गुन्हे शाखेची पथके गणेश मारणेचा कसून शोध घेत आहेत. मात्र अद्याप तो पोलिसांच्या हाती आलेला नाही. दरम्यान त्याने येथील सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज ( Sharad Mohol)  केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.