Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शोधल्या तब्बल 18 हजार ऑडिओ क्लिप

एमपीसी न्यूज –  शरद मोहोळ याच्या खून प्रकरणी ( Sharad Mohol) गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर (वय-31, रा. दत्तवाडी) याला मंगळवारी (दि.6) सायंकाळी अटक केली. कोथरुडमधील सुतारदरा परिसरात 5 जानेवारी रोजी शरद मोहोळचा साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता.

या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल 18  हजार 827 ऑडिओ क्लिपपैकी 10 हजार 500 ऑडिओ क्लिप तपासल्या. त्यामध्ये सहा ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळून आल्या आहेत. तपासादरम्यान साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्यातील संभाषणात अभिजित मानकरचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे आणि सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर या वेळी उपस्थित होते.

दरम्यान, शरद मोहोळ खून प्रकरणात यापूर्वी साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, अ‍ॅड. रवींद्र पवार, अ‍ॅड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे आणि गणेश निवृत्ती मारणे यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यान्वये कारवाई ( Sharad Mohol)  करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.