Talegaon Dabhade : माजी नगरसेवक वसंतराव (दादा) खांडगे यांचे निधन

एमपीसी न्यूज –  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, ऐतिहासिक ( Talegaon Dabhade ) नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष, हभप वसंतराव (दादा) मामासाहेब खांडगे (वय 89) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून खांडगे (दादा) यांनी धुरा सांभाळली. 1974 साली नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द विशेष ठरली. गवत बाजाराचे प्रसिद्ध व्यापारी म्हणून ते ख्यातनाम होते. अत्यंत प्रामाणिक, शांत, संयमी, मितभाषी आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित होते. सामाजिक, शैक्षणिक, सांप्रदायिक राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान राहिले. ते उत्कृष्ट मृदुंग वादक आणि भजनकरी देखील होते.

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शोधल्या तब्बल 18 हजार ऑडिओ क्लिप

त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, सूना, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक गणेश खांडगे यांचे वडील तर नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे व उद्योजक स्वानंद खांडगे यांचे ते चुलते होत.

अंत्यविधी बुधवारी (दि.7) सकाळी अकरा वाजता तळेगाव येथील बनेश्वर स्मशानभूमी येथे ( Talegaon Dabhade ) होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.