Pune : अग्निशमन दलाकडून झाडावर अडकलेल्या एका इसमाची सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज – पुण्यातील पर्वती भागातील तावरे उद्यानातील ( Pune) झाडावर एक इसम काल (मंगळवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास अडकला होता. त्याला खाली उतरता येत नसल्याने मदतीची मागणी अग्निशमन दलाकडे  करण्यात आली.यावेळी अग्निशमन दलाचे त्यांची सुखरुप सुटका केली आहे.

Talegaon Dabhade : माजी नगरसेवक वसंतराव (दादा) खांडगे यांचे निधन

यासाठी अग्निशमन दलाकडून जनता अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक वाहन  घटनास्थळी पाठवण्यात आले. हा इसम झाडावर किमान चाळीस ते पन्नास फुट उंचीवर एक इसम चढून बसला असून सदर इसमाने मद्यपान केले असल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

त्याचवेळी जवानांनी अशा परिस्थितीत झाडाखाली एक जाळी धरत खबरदारी घेऊन तातडीने शिडी लावली गली. तसेच  एक जवान वर झाडावर चढत जाऊन त्या इसमास सुमारे पंधरा मिनिटात शिडीच्या साह्याने त्याच्याशी संवाद साधत सुखरुप खाली घेऊन आला. यावेळी  पोलिस पथक देखील उपस्थित होते.

या कामगिरीत वाहनचालक ऋषिकेश बिबवे, सचिन चव्हाण तसेच तांडेल संजय जाधव, सुनिल नामे आणि फायरमन निलेश माने, महेश गारगोटे, मारुती देवकुळे, एकनाथ कुंभार,  सागर इंगळे, संभाजी अवताडे, परेश जाधव, दिपक कोकरे यांनी सहभाग ( Pune) घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.