Pune : नादरूपचा ‘संचित’ हा एकल नृत्यमहोत्सव संपन्न

एमपीसी न्यूज – नादरूप संस्थेच्या 38 व्या वर्धापन दिनानिमीत्त ‘संचित’ या एकल कथक नृत्य महोत्सव ( Pune ) नुकताच संपन्न झाला. कथक केंद्राच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षा आणि जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना उमा डोगरा यांच्या उपस्थित कार्यक्रम पुण्यातील एम ई एस बालशिक्षण सभागृह येथे पार पडला.

यावेळी तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर, किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर, ज्येष्ठ तबलावादक पंडित रामदास पळसुले, बंगळुरूचे नृत्य अभ्यासक आशिष मोहन खोकर, दिल्लीच्या नृत्य, संगीत अभ्यासक असलेल्या मंजिरी सिन्हा, दिलीप माजगांवकर आदी उपस्थित होते.

Pune : अग्निशमन दलाकडून झाडावर अडकलेल्या एका इसमाची सुखरुप सुटका

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ईशा नानल, श्रद्धा मुखडे, श्रेया कुलकर्णी, शिवानी करमरकर- शूरफेल्ड, मुक्ती श्री या शिष्यांचे सादरीकरण झाले. सुरुवातीला ईशा नानल, श्रद्धा मुखडे, श्रेया कुलकर्णी या तीन नृत्यांगनांनी एकत्रित सादरीकरण केले. यानंतर शिवानी करमरकर- शूर फेल्ड यांच्या नृत्याने उपस्थितांची वाह वाह मिळाली. मुक्ती श्री यांनी सादर केलेल्या रूपक तालाच्या सादरीकरणाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला.

अवनी गद्रे, लीना केतकर व शीतल कोलवालकर यांच्या नृत्य सादरीकरणाने महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला तर महोत्सवाच्या तिसरा व शेवटचा दिवस अमीरा पाटणकर, शीतल कपोले, श्रीकला जोशी, केतकी शाह, मानसी देशपांडे या शमा ताई यांच्या शिष्यांच्या सादरीकरणाने अविस्मरणीय ठरला. शेवटच्या दिवशी नादरूपशी संबंधित सर्वांचेच एक अनौपचारिक संमेलन संपन्न झाले.

गौरी लागू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ( Pune ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.