Sharad Mohol Murder case : शरद मोहोळ खून प्रकरणात सात आरोपींना 17 फेब्रुवारी पर्यंत मोक्का कोठडी

एमपीसी न्यूज – कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात ( Sharad Mohol Murder case ) अटक केलेल्या दोन वकिलांसह सात आरोपींना विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी 17 फेब्रुवारीपर्यंत मोक्का कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे व विठ्ठल शेलार यांच्यासह सर्व आरोपी आता मोक्का कोठडीत असून, त्यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे.

मोहोळच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिला आहे. या आरोपींना सोमवारी (दि.12) प्रथमच मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले.

 

Pune : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्ब्याला भीषण आग

तत्पूर्वी गुन्ह्यात अटक केलेल्या  ॲड. रवींद्र पवार , ॲड. संजय उडान, धनंजय मारुती वटकर, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे आणि रामदास ऊर्फ वाघ्या मारणे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.

‘या सर्व आरोपींची गुन्ह्याच्या कटातील सहभाग निष्पन्न करण्यासाठी समोरासमोर चौकशी करायची आहे, तसेच त्यांच्या मालमत्तेबाबत सखोल तपास करायचा आहे,’ असे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे आणि विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर आरोपींना मोक्का कोठडी ( Sharad Mohol Murder case ) सुनावली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.