Shikrapur : वरिष्ठांच्या कारवाईनंतर शिक्रापूर पोलिसांना जाग; अवैधरीत्या चालणाऱ्या दारू अड्ड्यावर छापे

Shikrapur police wake up after senior action; Raids on illegal liquor dens पोलिसांनी 28 हजार चारशे रुपयांची दारू जप्त केली. 

एमपीसी न्यूज – दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी शिक्रापूर येथील एका हॉटेलमध्ये होत असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रेत्यावर कारवाई केली. त्यानंतर पोलिसांना जाग आली असून शिक्रापूर येथे चालणाऱ्या दारूच्या सहा अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणाहून पोलिसांनी 28 हजार चारशे रुपयांची दारू जप्त केली. 

उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी शिक्रापूर चाकण रोड लगत असणाऱ्या एका हॉटेलमध्ये छापा टाकत कारवाई केली होती. त्यानंतर शिक्रापूर पोलीस खडबडून जागे झाले असून त्यांनी शिक्रापूर परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. शिक्रापूर सणसवाडी येथील सहा हॉटेलमध्ये कारवाई करत पोलिसांनी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लॉकडॉऊन च्या काळात म्हणजे मार्च 2020 ते जून 2020 या कालावधीत पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या 835 जणांवर कारवाई करत त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तब्बल एक कोटी 97 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.