Shirgaon : दारुंब्रे येथून दीड लाखांचे ऑफिस केबीन चोरीला

एमपीसी न्यूज – दारुंब्रे येथून दीड लाख रुपयांचे एम. एस. ऑफिसचे कॅबीन चोरून (Shirgaon) नेले आहे. हि घटना 7 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी शुक्रवारी (दि.4) प्रती सर्जेराव मोकाशी (वय 46 रा. पुणे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वर्कशॉपमधून 1 लाख 60 हजार रुपयांचे लोखंडी एम.एस ऑफीस केबीन कोणीतरी चोरून नेले आहे. चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.