_MPC_DIR_MPU_III

Pune : धक्कादायक! ससून रुग्णालयात महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल व अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज – पुण्यातील ससून रुग्णालयात दोन ज्येष्ठ महिलांच्या मृतदेहाची अदलाबदल होऊन त्यापैकी एका मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. परिणामी मृताच्या ख-या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला.  

_MPC_DIR_MPU_IV

मंदाकिनी धिवर (वय 62) आणि विमल पारखे (वय 72), या दोन महिलांचा शुक्रवारी ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी पारखे यांचे कुटूंबीय मृतदेह घेण्यासाठी आले. त्यांना कर्मचा-यांनी मृतदेह दाखवला असता हा आपल्याच आईचा मृतदेह असल्याचे सांगून कागदपत्रांची पूर्तता करून मृतदेह घेऊन गेले.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर मंदाकिनी धिवर यांचे नातेवाईक मृतदेह नेण्यासाठी आले. त्यांना कर्मचा-यांनी मंदाकिनी यांचा मृतदेह दाखविला असता हा त्यांचा मृतदेह नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आता मात्र ससूनच्या सर्व कर्मचा-यांची तारांबळ उडाली. त्यांनी पारखे यांच्या नातेवाईकांना तातडीने बोलावून घेतले. व मंदाकिनी यांचा मृतदेह दाखविला असता तो पारखे यांचा असल्याचे कळाले. त्यांनी चुकून मंदीकिनी यांचा मृतदेह घेऊन गेले असल्याचे मान्य केले. मात्र, आता उशीर झाला होता. कारण विमल यांचा समजून मंदाकिनी यांचा मृतदेह घेऊन गेले होते त्यांच्यावर त्यांनी अंत्यसंस्कारही पार पाडले होते.

या सर्व प्रकारामुळे मंदाकिनी यांच्या कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसून मनस्तापही झाला. पारखे यांनी मंदाकिनी यांच्या अस्थी त्यांच्या नातेवाईकांकडे स्वाधीन केल्या. तर विमल पारखे यांचा मृतदेह त्यांच्या मुलाकडे देण्यात आला. दरम्यान, या सर्व प्रकारात शवागरातील कर्मचाऱ्यांची काही चूक आहे का याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.