Dehu road News: धक्कादायक देहूरोडमधून एकाच दिवशी एकाच शाळेच्या 3 विद्यार्थिनी बेपत्ता 

एमपीसी न्यूज – धक्कादायक देहूरोडमधून एकाच दिवशी एकाच शाळेच्या 3 विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

 

स्नेहा नागरगोजे (वय 15), कसीश शिंदे, (वय 15), खुपशी शिंदे (वय 13) असे या तीन शालेय विद्यार्थिनी बेपत्ता झाल्या आहेत.
याबाबत वसंत नागरगोजे, वय 43 वर्षे, रा. देहूगाव यांनी फिर्यादी दिली आहे.

 

फिर्यादीची मुलगी स्नेहा नागरगोजे 11 जुलैला सकाळी 10 च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून शाळेला जाते सांगून गेली. शाळेच्या शिक्षिका यांनी फिर्यादीच्या पत्नीला फोन करून कळवले की त्यांची मुलगी शाळेला आली नाही. तसेच कसीश शिंदे, खुशी शिंदे, (रा. देहूगाव) या दोघी पण शाळेत आल्या नाहीत. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांचा शोध घेतला पण त्या मिळाली नाहीत. फिर्यादी यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने  कशाचे तरी आमिष दाखवून त्यांना पळवून नेले आहे.

 

Crime News : पिंपरीतील इस्टेट एजन्टकडून मागितली 25 लाख रुपयांची खंडणी

 

 

बेपत्ता  विद्यार्थिनींचे वर्णन:
स्नेहा नागरगोजेचा वर्ण काळा सावळा आहे. निळ्या रंगाचे जॅकेट, चौकडा शर्ट व निळी सलवार घातलेली होती. नाक सरळ. नाकामध्ये उजव्या बाजूला चमकी. मराठी व हिंदी भाषा बोलते. सोबत शाळेची बॅग आहे.

 

कसीश शिंदे निळ्या रंगाचे जॅकेट, चौकडा शर्ट व निळा सलवार घातलेला होता. नाक मोठे. मराठी व हिंदी भाषा बोलते. सोबत शाळेची बॅग आहे.

 

खुशी शिंदे निळ्या रंगाचे जॅकेट, चौकडा शर्ट व निळा सलवार घातलेला होता. नाक मोठे. मराठी व हिंदी भाषा बोलते. सोबत शाळेची बॅग आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.