Pune : पीएमपीएमएलच्या संचालक पदावरून सिद्धार्थ शिरोळे यांच्या राजीनाम्याचे स्वागतच – मुकुंद किर्दत

एमपीसी न्यूज – आज पुण्यात फिरणाऱ्या एकूण १६८५ बसेसपैकी तब्बल १८ टक्के म्हणजे ३११ बसेस रस्त्यावर बंद पडतात. फेऱ्या रद्द होतात किंवा बसेस रस्त्यावर उतरतच नाहीत. म्हणजे अंदाजे १ लाख ८४ हजार लोकांच्या बस चुकतात. त्यांचे सर्व वेळापत्रक चुकते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी दिलेल्या राजीनाम्याचे स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी दिली.

बसबाबत त्या कुठे आहेत, कधी येतील, लेट आहेत का, याची माहिती प्रवाशांना कळावी म्हणून ५२ कोटीची जीपीएस सिस्टीम लावण्यात आली. आता ही जीपीएस सिस्टीम पूर्णपणे बंद पडत आली आहे. ७९० बसला लावलेली डिजिटल बोर्ड बंद पडत आले आहे. सर्व चालू असताना पुण्यात पहिल्या ४ किलोमीटरसाठी १० रुपये तिकीट आहे.

विद्यार्थी बस पास पुण्यात ७५० /- आहे, असे असतानाही पुण्यातील पीएमपीएमएल तोट्यात आहे. या पीएमपीएमएलला २०१५ मध्ये १६७ कोटी तोटा होता, तो कमी होऊन २०१६ मध्ये १५१ कोटी झाला आणि संचालक सिद्धार्थ शिरोळे यांच्या काळात तोटा वाढून २१० कोटी झाला. भविष्यातील वाहतूक प्रश्नाची जाण असणाऱ्या कार्यक्षम व्यक्तीस हे संचालक पद दिले जावे, अशी मागणीही मुकुंद किर्दत यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.