Chinchwad : बँक खात्यातून परस्पर सव्वालाख पाठवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – बँक खात्यातून खातेदाराच्या परस्पर सव्वा लाख रुपये पाठवले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंदिरा पार्क, चिंचवडगाव येथे घडली.

विनोद देनाजी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्यासह एका अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बापीकुमार जितेंद्र कुंड (वय 62, रा. इंदिरा पार्क, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ते 6 मार्च 2019 या कालावधीत अज्ञात इसमाने फिर्यादी बापीकुमार यांच्या बँक खात्यातून एक लाख 25 हजार रुपये आरोपी विनोद यांच्या बँक खात्यावर पाठवले. खात्यावर आलेले पैसे विनोद यांनी काढून घेतले. याप्रकरणी बापीकुमार यांनी बुधवारी (दि. 27 नोव्हेंबर) चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.