Solid Waste: घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पुणे महापालिका आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची बैठक

एमपीसी न्यूज: पुणे सातारा रा.स.क्र.4 वरील पुणे महानगरपालिका हद्दीतील महामार्गावरील व सेवा रस्त्यावरील घनकचरा व्यवस्थापनेसंदर्भात नियोजनासाठी 8 जुलै रोजी पुणे महापालिका आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची बैठक पार पडली. (Solid Waste) येथील रस्त्यावरील साचलेला कचरा व राडारोडा उचलून स्वच्छता करून घेण्यासंदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेञिय कार्यालय, वारजे कर्वेनगर क्षेञिय कार्यालय,कोथरूड बावधन क्षेञिय कार्यालय,धनकवडी सहकारनगर क्षेञिय कार्यालय व औंध-बाणेर क्षेञिय कार्यालयाअंतर्गत येणार्या महामार्गावर व सेवा रस्त्यावरील साचलेला कचरा व राडारोडा उचलून स्वच्छता करून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महामार्गाच्या दोन्ही बाजूस नियमितपणे स्वच्छता करून घेण्यासाठी संबधित क्षेञिय कार्यालयांना अतिरीक्त पालिका आयूक्तांनी आदेश दिले आहेत.(Solid Waste)  तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून सदर ठिकाणी सी.सी.टी.व्ही बसवण्यात येणार असून त्याचे नियंञण संबधित क्षेञिय कार्यालयात असणार आहे.

 

Suicide Case : आई-वडील पालकसभेला गेले असता चौदा वर्षाच्या मुलीने केली आत्महत्या

 

महामार्ग प्राधिकरणाकडून एका गाडीची व दोन सेवकांची राज्य पातळीवर व्यवस्था करून क्षेञिय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने महामार्गावर कचरा टाकण्यात येणार्या परिसरात गस्त घालून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या ठिकाणी कचरा व राडारोडा न टाकणेबाबत जनजागतृी करण्यात येणार आहे. तसेच दंडात्मक कारवाई विषयक फलक लावण्यात येणार आहेत. 2016 मधील तरतुदींच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 180 रू दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

 

तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, नदीपाञ व नाले परिसरात बांधकाम व्यावसायिक व ठेकेदार यांच्यामार्फत राडारोडा टाकल्यास प्रति ट्रक 25000 रूपयांचा दंड व राडारोड्याचे प्रमाण कमी असल्यास 1250 प्रति मे.टन याप्रमाणे रक्कम वसूल करण्यात येईल. हा कचरा पुणे महानगरपालिकेच्या रा़डारोडा संकलन केंद्रावर आणून जमा करायचा आहे. 10 घनमीटर पेक्षा जास्त आकारमानाचा राडारोडा असल्यास उचलून नेण्यासाठी टोल फ्री क्रमांक 18001030222 यावर संपर्क साधून माहिती द्यावी. त्यानंतर सदरच्या राडारोड्यावर कारवाई करण्यात येईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.