Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेवर ढगफुटीचे संकट; चार ते पाच भाविकांचा मृत्यू

 

एमपीसी न्यूज : जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेवर (Amarnath Yatra) ढगफुटीचे संकट कोसळले आहे. प्राथमिक माहितीनुसार यामध्ये चार ते पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहे.

सायंकाळी 5.30 च्या सुमारास अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली. पहलगाम जॉइंट पोलिस कंट्रोल रूमने सांगितले की, लोकांना तेथून हटवले जात आहे. आयटीबीपीच्या म्हणण्यानुसार, अमरनाथ मंदिराजवळील काही लंगरांचेही नुकसान झाले आहे. जखमींना आणण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. ढगफुटीमुळे डोंगरावरून मुसळधार पाणी आणि ढिगारा खाली येऊ लागला. सध्या पाऊस थांबला आहे.

Toll Free Pass: पंढरपूर यात्रेस जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट मिळण्यासाठी पासची सुविधा

मात्र, प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत (Amarnath Yatra) मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढगफुटीनंतर आजूबाजूचा संपूर्ण परिसर पाण्यात बुडाला आहे.

कडेकोट बंदोबस्तात दक्षिण काश्मीरमधील 3,880 मीटर उंचीवर बांधलेल्या पवित्र अमरनाथ गुहेच्या दर्शनासाठी 5000 हून अधिक यात्रेकरूंचा समूह रवाना झाला होता. एकूण 242 वाहनांमध्ये 5,726 यात्रेकरू येथे आले होते. यामध्ये 4,384 पुरुष, 1,117 महिला, 57 मुले, 143 साधू, 24 साध्वी आणि एक ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.