Talegaon Dabhade News : पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत असून पोल्ट्री कंपन्यांकडून या व्यावसायिकांची पिळवणूक होत आहे. पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेतला असून पोल्ट्री व्यावसायिकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आमदार शेळके यांनी आश्वासन दिले.

आमदार शेळके यांनी आपल्या कार्यालयात मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या  अडी – अडचणींबाबत विशेष सभा बोलावली होती. या सभेस मावळ ॲग्रोचे संस्थापक ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे, पोल्ट्री संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यांच्यासह पोल्ट्री फार्मर एकनाथ गाडे, सचिन आवटे, संभाजी केदारी, उत्तम शिंदे, बाळासाहेब खरमारे, संतोष घारे, महेश काकरे, शिवाजी शिंदे, सुभाष केदारी, महेश कुडले, प्रविण शिंदे, गजानन खरमारे, विनायक बधाले आदी उपस्थित होते.

मावळ तालुक्यात शेतीपूरक पोल्ट्री व्यवसाय गेली अनेक वर्षे चालू असून येथील काही पोल्ट्री कंपन्या या फार्मरची पिळवणूक करीत असल्याचे संघटनेकडून निदर्शनास आणून दिले, तर पोल्ट्री फार्मरला चांगल्या दर्जाची (पक्षी) पिल्ले, खाद्य आणि औषधे द्यावीत, पक्षी वेळेत घेऊन जावेत, ग्रोव्हिंग चार्ज वाढवून मिळावा,15 दिवसात फार्मरचे पेमेंट कंपन्यांनी करावे आदी मागण्यांबाबतच्या निवेदनावर चर्चा केली.

पोल्ट्री संघटक गोपाळे गुरूजी यांनी सभेचे सुत्रसंचालन व आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.