Pune news: पी एम एम पी एल कडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खास विद्यार्थी फेऱ्या

एमपीसी न्यूज : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सायंकाळी गर्दीच्या वेळी आठ मार्गावरती सोमवार शुक्रवार सार्वजनिक सुट्ट्या बघून ‘खास विद्यार्थी फेऱ्या’ सुरू करण्यात आल्या आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सायंकाळी गर्दीच्या वेळी एकूण आठ मार्गावरती काही शेड्युलला ‘खास विद्यार्थी फेऱ्या पाच डिसेंबर पासून सुरु करण्यात आल्या आहेत.

मार्ग क्रमांक: विद्यार्थी स्पेशल मार्ग: बस ची वेळ
117 : एस वसंत टॉकीज ते धायरी मारुती मंदिर (मार्गे स्वारगेट) : सायंकाळी 5:40
82: डेक्कन कॉर्नर ते एन डी ए गेट नंबर 10: सायंकाळी 5:40
94 एस: डेक्कन कॉर्नर ते कोथरूड डेपो: सायंकाळी 5:45
38 एस: डेक्कन ते धनकवडी (मार्गे टिळक रोड स्वारगेट) : सायंकाळी 5:45
2 एस: वसंत टॉकीज ते कात्रज (मार्गे स्वारगेट): सायंकाळी 5:45
13 एस: वसंत टॉकीज ते अप्पर डेपो (मार्गे स्वारगेट): सायंकाळी 5:45
170: पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द: सायंकाळी 5:35
307 एस: चाफेकर चौक (चिंचवड) ते वाल्हेकरवाडी: सायंकाळी 5:50

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वरील बसेसना सायंकाळी गर्दीच्या वेळी खास विद्यार्थी फेऱ्या देण्यात येत असून, या मार्गावर प्रवास करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.