Pimpri : डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांच्या नृत्यास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध कथक नर्तक तसेच भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांचे बहारदार कथक नृत्य पिंपरी-चिंचवड महानगरपालिका  आयोजित भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापनदिन महोत्सवात ग. दी माडगूळकर ऑडीटोरियम मधे नुकतेच सादर झाले.

Pune : भवानी पेठेत सीमाभिंत कोसळली; गाड्यांचे नुकसान

डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांच्या कथक नृत्यास सर्व प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा गजरात दाद देत स्वागत केले. डाॅ.कपोते यांनी कथक नृत्यातील मंदीर परंपरा दाखवून पं.भीमसेन जोशी यांच्या ” बाजे रे मुरलिया बाजे ” या लोकप्रिय भजनावर अभिनय पेश करून रसिक प्रेक्षकांसमोर ना मंत्रमुग्ध केले.

डाॅ.कपोते यांनी कथक नृत्यात पं.बिरजूमहाराजांचे तिहाई, तुकडे, परण इ. सादर केले. डाॅ.कपोते यांनी घुंघरू व तबला यांची जुगलबंदी सादर करुन रसिकांची मने जिंकली तर शेवटी संत तुकाराम महाराजांचे ” अणु रेणिया थोकडा, तुकाराम आकाशा एवढा ” हे भजन सादर करून कार्यक्रमास रंग भरला.

‘ विठ्ठल विठ्ठल ‘ यावर प्रेक्षकांनी ही ताल धरला. डाॅ.पं.नंदकिशोर यांना तबला साथ मुंबईचे प्रसिद्ध तबलावादक पं.कालिनाथ मिश्रा यांनी केली.तर गायन साथ पं. संजय गरूड, बासरी साथ अझरुद्दीन शेख, पखावज ज्ञानेश कोकाटे, हार्मोनियम उमेश पुरोहित व पढंत यश त्रिशरण यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.