PMRDA : भोसरी पेठ क्रमांक 12 मधील 120 दुकानांचा होणार ई-लिलाव

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) कार्यकक्षेतील हवेली तालुक्यातील मौजे भोसरी, पेठ क्रमांक 12 येथील गृहयोजना क्रमांक 1 व 2 मधील 4800 घरकुल योजनेच्या ठिकाणचे 120 वाणिज्य दुकानांचे 80 वर्षांच्या कालावधीकरीता भाडेपट्ट्याने वाटप ई-लिलावाद्वारे होणार असल्याची माहिती आयुक्त राहुल महिवाल यांनी दिली.

यामध्ये कमीत कमी 10.36 चौ.मी. व जास्तीत जास्त 23.09 चौ.मी. क्षेत्राची दुकाने उपलब्ध आहेत. तसेच दुकानांची कमीत कमी विक्री किंमत 8 लाख 55 हजार 900 रुपये आणि जास्तीत जास्त विक्री किंमत 19 लाख 7 हजार 580 इतकी आहे. या दुकानांसाठी एकुण विक्री किंमतीच्या 10% अनामत रक्कम व फॉर्म  फी ची रक्कम 1 हजार रुपये असणार आहे.

Pimpri : डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांच्या नृत्यास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नोंदणी व निविदा दस्ताऐवज 13 जून रोजी सायंकाळी 5 (PMRDA) वाजल्यापासून ते  12 जुलै रोजी सायंकाळी 5  वाजेपर्यंत https://eauction.gov.in या संकेतस्थळावर डाउनलोड करता येतील. तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीदारांची घोषणा 8 ऑगस्ट 2023 रोजी प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. 10 ऑगस्ट  रोजी सकाळी 11  वाजल्या पासून संकेतस्थळावर ई-लिलाव प्रक्रीया सुरु होणार आहे. सदर ई-लिलाव प्रक्रीयेसंबंधी सूचना सविस्तर अटी व शर्तींचे माहितीपुस्तक https://eauction.gov.in व https://pmrda.gov.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.