Talegaon News : विद्याधर इनामदार यांचे अपघाती निधन

एमपीसी न्यूज : पुणे-मुंबई लोहमार्गावर एका अज्ञात रेल्वे गाडीतून पडून विद्याधर विजयकुमार इनामदार (वय 48, रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांचे निधन झाले. एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.

PMRDA : भोसरी पेठ क्रमांक 12 मधील 120 दुकानांचा होणार ई-लिलाव

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई लोहमार्गावर तळेगाव दाभाडे ते वडगावच्या दरम्यान एमआयडीसी रोडच्या पुलालगत सोमवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एका अज्ञात रेल्वे गाडीतून पडून विद्याधर इनामदार गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास रेल्वे पोलीस संजय तोडमल करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.