Pune : चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक; पोलिसांचा लाठीमार (व्हिडिओ)

नगररोडवरील हयात हॉटेलमध्ये कार्यक्रम बंद पाडला; हॉटेलची तोडफोड;

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये मराठा समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले. दुपारपर्यंत शांततेच्या मार्गात हे आंदोलन सुरू होते. मात्र दुपारनंतर कात्रज देहू रोड बाह्यवळणावर चांदणी चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागले. चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली तर काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली.

आंदोलकांनी कात्रज-देहुरोड बाह्यवळणासह संपूर्ण चांदणी चौकातील सर्व रस्ते रोखून धरले होते. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. तर नगररोडवरील हयात हॉटेलमध्ये सुरू असलेला कार्यक्रम बंद पाडण्यात आला. तसेच हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=ck03L1txCZw&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.