Chakan : चाकण शहरात कडकडीत बंद

बहुतांश कारखाने बंद; हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाचा मागणीसाठी गुरुवारी (दि.9) सकाळपासून चाकण शहरासह पंचक्रोशीत कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील व्यापारी दुकानदार यांनी उत्स्फूर्तपणे आप-आपले व्यवहार बंद ठेवले होते. शाळा,महाविद्यालये, कारखानदारी, पेट्रोलपंप तसेच सर्व व्य‍वहार बंद ठेवण्यात आले होते.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आणि शहरातील बाजारपेठेत सकाळपासून शुकशुकाट पहावयास मिळत होता. मराठा आरक्षणाकरिता नुकत्याच झालेल्या आंदोलनातील चाकण मधील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली होती. त्यामुळे शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळी सहा वाजल्यापासून संपूर्ण शहरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.