Pimpri News : बोपखेलच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा अतिवापरावर बनवले जनजागृतीपर मॉडेल

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका इंग्रजी माध्यम शाळा, बोपखेलच्या विद्यार्थ्यांनी “प्लास्टीकचा अतिवापर” याविषयावर जनजागृती करण्यासाठी (Pimpri News) तयार केलेले मॉडेल महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये लावण्यात आले आहे. एकविसाव्या शतकात आपण ग्लोबल वॅार्मिंगसारख्या गंभीर समस्येला तोंड देत आहोत.

प्लास्टिकचा अतिवापर हे आपल्यासमोरचे एक मोठे आव्हान आहे. इंग्रजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षक मेहबूब मुल्ला यांच्यासोबत अनमोल बोर्डे आणि ओवी थोपटे या दोन विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांपासून आकर्षक असे मॉडेल तयार केले आहे.

Wakad : ऑनलाइन नोकरी देऊन व्यावसायिक महिलेची 8.25 लाख रुपयांची फसवणूक

“आशेचा किरण” असे या मॉडेल चे नाव असून उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी या मॉडेलची पाहणी करून विध्यार्थांचे कौतुक केले. यावेळी आकांक्षा फाउंडेशनचे निखील एकबोटे हे देखील उपस्थित होते. हे मॉडेल महापालिकेत नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहे.

“प्रत्येक माणसाने नेहमी कापडी पिशवी, खाण्यासाठी स्वतःचा चमचा सोबत बाळगल्यास प्लास्टिकचा वापर कमी करून प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर, प्लांटर्स, कंटेनर, इ. मध्ये रोजच्या दैनंदिन जीवनात तसेच घरामध्ये प्लास्टिकचा पुनर्वापर केल्यास हा तोटा बऱ्याच अंशी भरून निघू शकतो. (Pimpri News) आपले पर्यावरण आणि आपली पृथ्वी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा हरित बनवण्यासाठी नक्कीच मदत होईल” असा संदेश या मॉडेल मधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.