Sus Road News: सुस रोड वर झाड पडल्याने वाहतूक कोंडी, मोठा अपघात टळला

एमपीसी न्यूज:  सुस रोड वर काल रात्री एक मोठे झाड पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (Sus Road News) अंदाजे अर्ध्या तासात अग्निशमन कर्मचाऱ्यांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.
मारुंजी येथील फायर ब्रिगेडला या घटनेची वर्दी काल रात्री 11.15 वा चे सुमारास मिळाली होती. हे झाड सनी वर्ल्ड हॉटेल जवळ पडले होते. त्यामुळे एक पीएमपीएल(PMPML) बस अडकली होती व तिला पुढे जाता येत नव्हते. बस ड्राइव्हरने अग्निशमन विभागास याबाबत कळवले होते.

सुदैवाने बस तेथून जात असताने हे झाड बसवर पडले नाही. यामुळे मोठा अपघात टळला आहे. हे झाड मोठे असल्याने पूर्ण रस्ता बंद झाला होता. (Sus Road News) तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अंदाजे अर्ध्या तासात अग्निशमन कर्मचाऱ्यांनी ते झाड कापून दूर करून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.