Indrayani : इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज – लोणावळा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार (Indrayani) पाऊस पडत आहे. या पावसाचा अंदाज लक्षात घेता पुढील 48 तासात या धरणाच्या नदीपात्रातुन पाण्याच्या विसर्गास सुरु होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Rain Alert : पुणे, कोल्हापूर, पालघर, नाशिक आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट

लोणावळा धरणात (Indrayani) जलाशय पातळी 623.98 मीटर झाली आहे. तर पाणीसाठा 7.11 द.ल.घ.मी. (60.74 टक्के) इतका झाला आहे. विसर्ग टाळण्यासाठी प्रशासन जास्तीत-जास्त पाणी पश्चिमेकडे वळवत आहे. जेणेकरून खोपोली वीजगृहातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. तरीही पाण्याच्या विसर्गाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी इंद्रायणी नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये. नदीपात्रामध्ये जनावरे, शेत पंप, अवजारे व इतर साहित्य तात्काळ काढून घ्यावे, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.