Sinhagad : सिंहगड रस्त्यावर पडलेल्या हायटेन्शन वायरचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यातील सिंहगड (Sinhagad) रस्ता परिसरात एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावर पडलेल्या हायटेन्शन वायरचा धक्का लागल्याने एका वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रोहित संपत थोरात (वय 20, रा. सिंहगड रस्ता) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, या घटनेने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रोहित दूध आणण्यासाठी फुटपाथवरून जात होता. यावेळी त्याचा पाय फुटपाथवर पडलेल्या हायटेन्शन वायरला लागला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. रोहित स्वतः आईसोबत भाजी विक्रीचे काम करत होता. घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी पाहणी करून घटनेची नोंद केली आहे. त्याची चौकशी केली जात आहे.

Sus Road News: सुस रोड वर झाड पडल्याने वाहतूक कोंडी, मोठा अपघात टळला

दरम्यान, या घटनेनंतर काहीजण (Sinhagad) रोहितने हाताने वायर धरल्याचे सांगतात. तर काहीजण त्याच्या पायाला वायर लागल्याचे सांगत आहेत, असे पोलीसांनी सांगितले आहे. ही वायर रात्री पडली होती. सकाळपर्यंत काढली गेली नव्हती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.